''..वसंतात यावी बहार ,
नाहीतर पानगल.
फुलावे जैतून पानोपान ,
किंवा रहावे निष्फल,
यावे रसरशीत अन्जीरे,
अथवा वृक्ष कर्पावे.
रहाव्यात गोष्टी माझ्या,
गाई वासरे हम्बरण्या.
अथवा व्हावा मोकळा ,
सूना-सूना.
तरीही तुजवर जडेल ,
माझी प्रीती.
राहील अढल,
सफल ती...
पिता-पुत्रांची जोड़ी.
तुजवीण नसे शाश्वत काही.
तूच सर्वसमर्थ,
वसे मम हृदयी..! ''
[ पवित्र बायबल : हबक्कूक::३;१७-१९ वर आधारीत ]