बुधवार, ७ ऑक्टोबर, २००९

देवावारील अढल प्रीती

                                         
''..वसंतात यावी बहार ,

नाहीतर पानगल.

फुलावे जैतून पानोपान ,

किंवा रहावे निष्फल,

यावे रसरशीत अन्जीरे,

अथवा वृक्ष कर्पावे.

रहाव्यात गोष्टी माझ्या,

गाई वासरे हम्बरण्या.

अथवा व्हावा मोकळा ,

सूना-सूना.

तरीही तुजवर जडेल ,  

माझी प्रीती.

राहील अढल,

सफल ती...

पिता-पुत्रांची जोड़ी.

तुजवीण नसे शाश्वत काही. 

तूच सर्वसमर्थ,

 वसे मम हृदयी..! ''

[ पवित्र  बायबल : हबक्कूक::३;१७-१९ वर आधारीत ]